
1865 22-Dec-2017, Fri
- कोल इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 'स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलॉकेटींग कोयला ट्रान्सपेरंटली इन इंडिया (SHAKTI/शक्ती)’ अंतर्गत इंधन पुरवठा करारांवर स्वाक्षरी करण्याकरिता मंजूरी दिली आहे.
- ‘शक्ती’ अंतर्गत सुमारे 27.18 दशलक्ष टनची वार्षिक कोळसा शृंखला 10 यशस्वी बोलीदारांकडून आरक्षित केली गेली आहे.
- या करारांमुळे 47 अब्ज युनिटपेक्षा अधिक वार्षिक वीज निर्मिती होण्याचे अपेक्षित आहे.
- ‘शक्ती’ या नवीन धोरणांतर्गत कोळसा मंत्रालय, कोल इंडिया किंवा सिंगरेनी कोलियरिएस कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रस्तुत केलेल्या ऊर्जा क्षेत्रातील विविध विभागांसाठी कोळसा शृंखलेच्या वाटपासाठी दिशादर्शके तयार करण्यात आली आहेत.
- जेणेकरून स्थानिक कोळसा आधारावर आधीच निश्चित करण्यात आलेल्या ऊर्जा खरेदी करारांसह वीज उत्पादकांसाठी लिलावाच्या आधारावर अधिसूचित किंमतीवर कोळश्याची शृंखला मंजूर करता येईल.
- कोळसा मंत्रालय- कॅबिनेट मंत्री पियुष गोयल
- कोळसा मंत्रालय- राज्य मंत्री हरीभाई चौधरी