
1184 22-Mar-2019, Fri
- ठाणे येथील कोर्टनाका परिसरात ठाण्याचे नाक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि मागील 35 वर्षांपूर्वी अवजड वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झालेल्या ऐतिहासिक अशोकस्तंभाची आता नव्याने भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात मूर्तिकार श्रेयस खानविलकर हे निर्मिती करत आहेत. तो लवकरच ठाण्यात स्थानापन्न होणार आहे.
- बाहेरगावहून ठाण्यात येणाऱ्या किंवा स्थानिक नागरिकांसाठी कोर्टनाक्यावर असलेला अशोकस्तंभ म्हणजे एक मैलाचा दगड होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात ठाणे कोर्टनाका आणि अशोकस्तंभ सुपरिचित होता. स्वातंत्र्यानंतर ठाण्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढा आणि शहिदांची आठवण म्हणून या स्तंभाची उभारणी 1952 साली केली.
- तर या कार्यात हातभार लावणाऱ्या ठाणेकरांची आणि याच ठिकाणी इंग्रज शिपायांचे आसूड अंगावर झेलणार्या देशभक्तांची चौथी पिढी आजही ठाण्यात वास्तव्यास आहे.
- संपूर्ण ठाणेकरांच्या भावना निगडित असलेल्या या अशोकस्तंभाला 1983च्या दरम्यान एका अवजड वाहनाने धडक दिली. यात तो उद्ध्वस्त झाला. त्यानंतर, आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर, भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात त्या स्तंभाचे काम सुरू आहे.