Asha Bagge announces First Literary Award

 1. प्रख्यात मराठी लेखिका आशा बगे यांना प्रथमच दिला जाणारा ‘प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
 2. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
 3. विदर्भ साहित्य संघाचे व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या व आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
 4. स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी ओळख असलेल्या आशा बगे यांनी परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत त्यांनी सुमारे चार दशके कथा, कांदबरी, ललित असे चौफेर लेखन केले आहे.
 5. त्यांच्या ‘भूमी’ या कांदबरीला २००६साली साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे.
 6. ‘दर्पण’ या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
 7. साहित्य क्षेत्रातील त्यांचे हे योगदान डोळ्यापुढे ठेवून महामंडळाने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे.


International Happiness Day: 20 March

 1. दरवर्षी 20 मार्चला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस (International Day of Happiness)’ साजरा केला जातो.
 2. यावर्षी हा दिवस “शेअर हॅप्पीनेस (आनंद वाटा)” या विषयाखाली साजरा करण्यात येत आहे.
 3. यावर्षी संबंध, सालसता आणि एकमेकांना मदत करणे याचे महत्त्व पट‍वून देण्यावर केंद्रीत आहे.
 4. 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 17 शाश्वत विकास उद्दीष्टे जाहीर केलीत, जे दारिद्र्य निर्मूलन, असमानता कमी करणे आणि पृथ्वीचे संरक्षण करणे याची मागणी करते. या तीन मुख्य पैलुंमधून समाजाचे कल्याण आणि समाजात आनंद निर्माण होतो.
‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस (International Day of Happiness)’
 1. पार्श्वभूमी:-
 2. आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाचे सल्लागार जयमे इलीयन यांनी केली.
 3. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत (UNGA) 12 जुलै 2012 रोजी ठराव 66/281 मंजूर केला गेला, यामधून 20 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.
 4. 2013 साली प्रथम ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस’ पाळण्यात आला.
 5. आंतरराष्ट्रीय आनंद दिवस हा माणसामध्ये जीवनाची नवी उमेद जगावतो आणि सार्वजनिक धोरण उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये आनंदी जीवनाचे महत्त्व पटवून देण्याकरिता पाळला जातो.


Telugu Desam Party out of BJP-led National Democratic Alliance

 1. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडला आहे.
 2. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकार विरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न सुरु असताना चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपाला धक्का दिला आहे. 
 3. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.
 4. आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
 5. तर भाजपाचा मित्रपक्ष आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
 6. ८ मार्च रोजी तेलगू देसम पक्षाचे नेते अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते.
 7. लोकसभेत तेलगू देसमचे १६ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
 8. रालोआतून बाहेर पडताच तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडणार, असे स्पष्ट केले आहे.
 9. सद्यस्थितीत ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ५३६ खासदार आहेत. त्यात एकट्या भाजपाचेच २७३ खासदार आहेत. ही संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे.
 10. टीडीपीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर रालोआचे संख्याबळ ३१२वर आले आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आला तरी तो मंजूर होणार नाही, हे स्पष्ट आहे.


For the first time, researchers found signs of molecular disorders

 1. मोठ्या संख्येने मृत रुग्णांच्या मेंदूच्या कॉर्टेक्सची तपासणी करीत असताना संशोधकांना प्रथमच मानसिक आजारांच्या अणु-रचनेसंबंधी संकेत आढळून आले आहेत.
 2. अभ्यासात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. डॅनियल एच. जीस्चविंड यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूकडून मृत व्यक्तींच्या मेंदूपासून घेतलेल्या 700 सेरेब्रल कॉर्टेक्स नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
 3. या अभ्यासामुळे मानसिक आरोग्यासंबंधी समस्या मेंदूच्या भौतिक स्वरुपात दिसू शकतात, असे निष्कर्ष काढण्यात आले आहे.
अभ्यासाचे निष्कर्ष
 1. ऑटीझम, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन आणि मद्यविकार या मानसिक आजारांचा अभ्यास करताना असे आढळले की, ही स्थिती विशिष्ट जीन क्रियाकलापांच्या समांतर असून सेरेब्रल कॉर्टेक्समधील जनुकांचे (जीन्स) भाव किंवा मेंदूच्या सर्वात बाह्य थरात आढळते.
 2. विश्लेषणात बायपोलर डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनिया यांच्यात एकरूपता दिसून आली. हे आश्चर्यकारक होते कारण पूर्वी सामान्यत: मूड डिसऑर्डर म्हणून पाहिले जात होते आणि त्यामुळे नैराश्यशी संबंधित असल्याचे मानले जाते. शिवाय मद्यविकार आणि इतर चार विकारांमध्ये कोणताही परस्परसंबंध आढळून आलेला नाही.
 3. स्किझोफ्रेनिया आणि ऑटीझम या दोन्हीमध्ये काही जनुके सक्रिय होते, जे नंतरच्या काळात अधिक सक्रिय झालेत.
 4. आत्मकेंद्रीपणा, नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डर या तीन विकारांमध्ये मेंदूच्या पेशींच्या संपर्कावर प्रभाव पडतो.
 5. हा शोध म्हणजे रोगाचे निदान करण्यासाठी उद्देशपूर्ण पद्धती विकसित करण्याच्या दिशेने एक नवे पाऊल ठरणार आहे.


 Lokesh Rahul best player of the year: Wisden India

 1. विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भारताच्या लोकेश राहुलची निवड करण्यात आली आहे.
 2. या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्ल्ड कपदरम्यान जल्लोष करतानाचे छायाचित्र वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
 3. भारताचा कर्णधार विराट कोहलीला नियतकालिकाने सर्वांत यशस्वी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवले आहे.
 4. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या दीप्ती शर्माचा समावेश वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्येकरण्यात आला आहे.
 5. भारताच्या इरापल्ली प्रसन्ना आणि शांता रंगस्वामी या अनुक्रमे माजी पुरुष व महिला क्रिकेटपटूंचा समावेश विस्डेन इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे.


The Importance of Today's Day in History 20 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
  2. १९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
  3. १९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
  4. १९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
  5. २०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

जन्म:-

जन्म
 1. १८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६)
 2. १९०८: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९८५)
 3. १९२०: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
 4. १९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १७२६: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञसर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १६४२)
 2. १९२५:ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)
 3. १९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९)
 4. २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)


Top

Whoops, looks like something went wrong.