The initiative to give 'Khadi yarn Mala' free of cost to the Charkha museum in New Delhi

 1. नवी दिल्लीतील ‘राष्ट्रीय चरखा संग्रहालय’ येथे प्रत्येक प्रवेश तिकिटाच्या खरेदीवर खादीची एक ‘सूत माला’ निशुल्क देण्याचा उपक्रम राबवला जात आहे.
 2. प्रत्येकी 20 रुपयांच्या प्रवेश तिकिटांमधून गोळा होणारा निधी आर्थिकदृष्ट्‍या कमकुवत खादी कामगारांच्या कुटुंबियांना तसेच तिहार कारागृहाच्या त्या कैद्यांना मदत प्रदान करणार, जे त्या सूत माला तयार करतात.
 3. त्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची एक विश्वस्त मंडळ तयार करण्याची योजना आहे.
 4. नवी दिल्लीतील राष्ट्रीय चरखा संग्रहालयात भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी देशाच्या विविध भागात सूत कातण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण म्हणजेच ‘चरखा’ ठेवण्यात आले आहे.
 5. संग्रहालयात 14 प्राचीन चरखे प्रदर्शनास ठेवण्यात आले आहेत.
 6. याचे उद्घाटन मे 2017 मध्ये करण्यात आले.
 7. या ठिकाणी NDMC आणि KVIC यांनी एक 26 फूट (जवळपास 8 मीटर) लांब चरखा उभारला आहे, जो 13 फूट उंच आणि 5 टन वजनी आहे. हा जगातला सर्वात मोठा चरखा आहे.


 Correction in 'E-waste (Management) Rules-2013'

 1. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने देशामध्ये इलेक्ट्रॉनिक-कचर्‍याचे पर्यावरणाशी अनुकूल अश्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ई-कचरा नियमांमध्ये दुरूस्ती केली आहे.
 2. 22 मार्च 2018 रोजी अधिसूचित GSR 261 (E) अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन नियम-2016 मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. ई-कचरा संकलनाचे नवे निधार्रित लक्ष्‍य 1 ऑक्टोबर 2017 पासून प्रभावी असणार आहे.
 3. देशात ई-कचर्‍याचे सुरळीत आणि योग्य नियोजनाने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने, कचर्‍याचे पुनर्नवीनीकरण किंवा विघटित करणार्‍या प्रकल्पांना परवानगी देणे आणि त्यांना संगठित करण्यासंबंधी नियम आहेत.
 4. नियमांमध्ये विस्तारीत उत्‍पादक उत्तरदायीत्व (EPR) याच्या व्यवस्थेला पुनर्व्याखित करण्यात आले आहे आणि याअंतर्गत अलीकडेच विक्री सुरू करणार्‍या ई-उत्‍पादकांसाठी ई-कचरा संकलनाचे नवे लक्ष्‍य निर्धारित करण्यात आली आहे.
‘ई-कचरा (व्यवस्थापन) नियम-2016’
 1. ठळक बाबी:-
 2. विविध टप्प्यांमध्ये ई-कचर्‍याच्या संकलनाचे लक्ष्‍य सन 2017-18 दरम्यान उत्‍पन्‍न करण्यात आलेल्या कचर्‍याच्या वजनाच्या 10% असणार, जो 2023 सालापर्यंत वार्षिक 10% याप्रमाणे वाढत जाणार आहे. 2023 सालानंतर हे लक्ष्‍य एकूण उत्‍पन्‍न कचर्‍याच्या 70% होणार आहे.
 3. एखाद्या उत्‍पादकाचे विक्री साल त्याच्या उत्‍पादनाच्या सरासरी आयुर्मर्यादेपेक्षा कमी असल्यास अश्या नव्या ई-उत्‍पादकॉसाठी ई-कचरा संकलनासाठी वेगळे लक्ष्‍य निर्धारित केले जाणार आहे. उत्‍पादनांची सरासरी आयुर्मर्यादा वेळोवेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निर्धारित केले जाईल.
 4. धोकादायक पदार्थांच्या कमीकरण (RoHS) तरतुदी अंतर्गत अश्या उत्‍पादनांची तपासणीसाठी येणारा खर्च सरकार देणार आहे. जर उत्‍पादन RoHS च्या व्‍यवस्थेला अनुसरून झाले नसेल तर त्या परिस्थितीत तपासाचा खर्च उत्‍पादकाला द्यावा लागणार आहे.
 5. उत्‍पादक उत्तरदायीत्व संघटना (PROs) यांना नव्या नियमांतर्गत कामकाजासाठी स्वत:ला नोंदणीकृत करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.


Correction of Bio-Medical Waste Management Rules for Human Health Protection

 1. रुग्णालयामधून निघणार्‍या संसर्गजन्य जैव-वैद्यकीय कचर्‍यापासून पर्यावरण आणि मानवी आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम-2016’ मध्ये दुरूस्ती केली आहे.
 2. भारतात जैव-वैद्यकीय कचर्‍याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाशी अनुकूल बनवत त्याच्या व्यवस्थेला लागू आणि त्याची अंमलबाजवणी करण्यासाठी प्रभावी बदल करण्यात आले आहे.
 3. ‘जैव-वैद्यकीय कचरा’ म्हणजे उपचार केंद्र, निदान प्रयोगशाळा, रक्तपेढ्या आदी ठिकाणी निदान, उपचार किंवा लसीकरणादरम्यान वापरामुळे निर्माण होणारा कचरा होय. उदाहरणार्थ सुई, ग्लुकोज बॉटल, आदी.
जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम
 1. या सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत -
 2. जैव-वैद्यकीय कचरा साधारणतः आरोग्य सेवा-सुविधा दरम्यान निर्माण होतो. आदेशानुसार, या सुविधांमध्ये उत्पादित कचरा, जसे क्लोरीनेटेड प्लास्टिक थैल्या आणि हातमोजे 27 मार्च 2019 नंतर चलनातून बाद केले जातील. सध्या रक्ताची पिशवी यामधून वगळण्यात आली आहे.
 3. सर्व वैद्यकीय सुविधा प्रदातांना जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन (दुरूस्ती) नियम-2018 याच्या प्रकाशनाच्या तारखेनंतर दोन वर्षांच्या कालावधीतच आपल्या संकेतस्थळावर वार्षिक अहवाल उपलब्ध करून द्यावे लागणार.
 4. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे/प्रदूषण नियंत्रण समित्या यांना प्राप्त माहितीचे संकलन, समीक्षा आणि विश्लेषण करणे आणि ती माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळापुढे एक नव्या प्रपत्रात (फार्म IV-A) सादर करावयाची आहे.
 5. सर्वसामान्य जैव-वैद्यकीय कचरा उपचार प्रक्रिया आणि निवारण सुविधेसंबंधी कार्यरत संस्थांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिशानिर्देशांनुसार, 27 मार्च 2019 पर्यंत जैव-वैद्यकीय कचर्‍याला हाताळण्यासाठी बार कोडिंग आणि वैश्विक स्थितिदर्शक प्रणाली (GPS) स्थापित करणे आहे.


 Robert P., a Canadian mathematician. Langels to receive 'Abel Prize'

 1. कॅनेडाचे गणितज्ञ रॉबर्ट पी. लॅंगलँड्स यांना 2018 सालचा ‘एबेल पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
 2. 81 वर्षीय लॅंगलँड्स यांना हा पुरस्कार त्यांच्या ‘लॅंगलँड्स कार्यक्रम’ या प्रकल्पामध्ये प्रतिनिधित्व सिद्धांताला संख्या सिद्धांताशी जोडण्यासाठी दिला जात आहे.
 3. ‘लॅंगलँड्स कार्यक्रम’ यामध्ये अंदाजांचे एक विशाल जाळे आणि संख्या सिद्धांतांमध्ये गॉलियस समूहाच्या अभ्यासासाठी प्रतिनिधित्व सिद्धांत आणि ऑटोमॉर्फिक रूपांना जोडण्याचे परिणाम दर्शवते.
 4. मे 2018 मध्ये ओस्लोयेथे आयोजित एका पुरस्कार समारंभात नॉर्वेचे राजा पाचवे हेराल्ड यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.
 5. ‘एबेल पुरस्कार’ हा गणितीशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला नॉर्वेजियन अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेट्टर्स कडून दिला जाणारा पुरस्कार आहे.
 6. 2003 सालापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पुरस्कारस्वरूप 6 दशलक्ष NOK (सुमारे USD 715,000) रोख बक्षीस दिले जाते.


 In the ISSF Junior World Cup, India's Manu Bhaker gold medal

 1. भारताची नेमबाज मनु भाकेर हिने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (ISSF) ज्युनियर विश्वचषक रायफल/पिस्तूल/शॉटगन 2018’ स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे.
 2. पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात गौरव राणाला रौप्यपदक आणि अनमोल जैनने कांस्यपदक पटकावले आहे. याचे सुवर्णपदक चीनी झेहाओ वांग्स याने पटकावले.
 3. शिवाय मनु भाकेर, गौरव राणा आणि महिमा अग्रवाल यांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या प्रकारचे रौप्यपदक चीनने तर थायलंडने कांस्यपदक पटकावले.
 4. 1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
 5. दरवर्षी चार स्पर्धां घेतल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून विश्वचषक अंतिम आयोजित करण्यात येत आहे.
 6. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली.


Top