1. सन 1948 पासून दरवर्षी 24 ऑक्टोबरला ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिवस’ (United Nations Day) साजरा केला जात आहे.
  2. संयुक्त राष्ट्रसंघाची सनद प्रभावी करण्यात आलेल्या घटनेला आज 72 वर्षे पूर्ण झाली आहेत.
  3. दरवर्षी UN कडून निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  4. यात उपक्रम, सेमिनार, चर्चासत्र, विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात व्याख्याने, कला स्पर्धा, रॅली, चित्रपटांचे प्रदर्शन आणि पुस्तक / छायाचित्र प्रदर्शने अश्या कार्यक्रमांचा समावेश असतो.
  5. यावर्षी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत "पोटेन्शीयल इन डायवर्सिटी" या संकल्पनेखाली कॉन्सर्ट आयोजित केले गेले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ दिवसाची पार्श्वभूमी

  1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1971 साली ठराव 2782 चा अवलंब करीत 24 ऑक्टोबर हा ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिवस’ म्हणून जाहीर केला. 
  2. हा दिवस 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पळण्यात येणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघ सप्ताह (United Nations Week) चा एक भाग आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघ:-

  1. 1945 साली UN सनद (UN Charter) (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन  24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ अस्थित्वात आले.
  2. याला सुरक्षा परिषदेचे मूळ 5 कायमचे सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली.
  3. स्थापनेच्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघाची 51 सदस्य राष्ट्रे होती; ही संख्या आता 193 झालेली आहे.

 उद्दिष्टे:-

  1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे,
  2. मानवी हक्काला प्रोत्साहन देणे,
  3. सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण,
  4. पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ,
  5. नैसर्गिक आपत्ती,
  6. आणि सशस्त्र संघर्ष

अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

  1. संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरशासकीय संस्था आहे.
  2. संयुक्त राष्ट्रसंघाचे  मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
  3. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस’ हे असून वर्तमानात हे पद  पोर्तुगीज अँटोनियो गुटेरस यांच्याकडे आहे.
  4. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -

  1. UN महासभा (General Assembly)
  2. UN सुरक्षा परिषद (Security Council)
  3. UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)
  4. UN सचिवालय
  5. UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि
  6. UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -

  1. जागतिक बँक समूह
  2. जागतिक आरोग्य संघटना (WHO)
  3. द वर्ल्ड फूड प्रोग्राम
  4. संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)
  5. संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children's Fund –UNICEF)


  1. भारतीय हॉकी संघाने ढाका (बांग्लादेश) मध्ये खेळल्या गेलेल्या ‘हॉकी आशिया चषक 2017’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  2. यासोबतच भारताने ही स्पर्धा तिसर्‍यांदा जिंकलेली आहे.
  3. यापूर्वी 2003 आणि 2007 साली ही स्पर्धा जिंकली होती.
  4. पराभव - स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने  मलेशियावर मात केली. स्पर्धेत कोरियाचा पराभव करत  पाकि स्तान संघाने स्पर्धेचे कांस्यपदक मिळवले.
  5. हॉकी आशिया चषक ही आशियाई हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जाणारी आशियामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे.  
  6. ही स्पर्धा पहिल्यांदा  1982 साली खेळली गेली.
  7. या स्पर्धेत सध्या 16 संघांचा सहभाग असतो.


Top