
1098 09-Oct-2017, Mon
- अखंड अभ्यास, प्रचंड पैसा आणि आफाट मनशक्ती यांची बेगमी करीत आपल्या उच्च कौशल्यांना वाव मिळविण्यासाठी अमेरिकेला नोकरीसाठी जाणार असाल, तर तुमच्या विस्तारित कुटुंबीयांसाठी अमेरिकेची व्दारे बंद दिसतील.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाचे हीत जपण्यासाठी अतिउच्च कौशल्ये असलेल्या भारतीय कामगारांनाच स्थलांतर नियम व्यवस्था लागू केली जाईल, असे सांगत हा नियम त्यांच्या विस्तारित कुटुंबासाठी नसेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे जोडीदार अथवा अल्पवयीन मुलांखेरीज वृद्ध माता-पिता, काका-काकी, सज्ञान मुले आणि पुतणे-पुतणी यांना अमेरिकेत नेता येणार नाही.
- तसेच ट्रम्प यांनी नवीन स्थलांतर योजनेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी नुकताच काँग्रेसकडे पाठवला आहे. यात एच 1 बी व्हिसाचा उल्लेख केलेला नाही. भारतीय माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी एच 1 बी व्हिसा महत्त्वाचा मानला जातो.
- देशाच्या ग्रीन कार्ड प्रणालीचा ट्रम्प यांनी फेरआढावा घेतला असून त्यात मेक्सिको सीमेवरील भिंत व देशात कुणालाही बरोबर न घेता येणाऱ्या लहान मुलांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे