1. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी बुरुंडी हा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या सदस्यत्वामधून बाहेर पडणारा पहिला देश बनला आहे.
  2. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC) हे जगाती   ल एकमेव आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायाधिकरण आहे, ज्यामध्ये संहार, मानवताविरोधी गुन्हे, युद्धसंबंधी गुन्हे आणि हल्ला करण्यासंबंधी गुन्हे या संदर्भात आरोपींच्या विरुद्ध कारवाई केले जाते. हे नेदरलँडमधील हेगमध्ये भरणारी एक आंतरसरकारी संघटना आणि आंतरराष्टीय न्यायाधिकरण आहे.
  3. जेव्हा राष्ट्रीय न्यायालय गुन्हेगारांवर खटला चालविण्यास अपात्र किंवा अक्षम ठरतात किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद किंवा वैयक्तिक देशाकडून या न्यायालयाचा उल्लेख केला जातो तेव्हा याकडे याचिका दाखल केली जाते.
  4. १७ जुलै १९९८ रोजी रोम करार अंगिकारल्यानंतर ICC ने १ जुलै २००२ पासून आपले कार्य सुरू केले. रोम करार हा एक बहुपक्षीय करार आहे, जे ICC चे मूलभूत व प्रशासकीय दस्तावेज आहे.
  5. बुरुंडी या अफ्रिकेमधील देशाने या आंतरराष्ट्रीय न्यायालयावर असा आरोप केला आहे की, न्यायालय खंडाच्या बाबतीत भेदभाव दर्शवीत आहे. बुजुंबुरा ही बुरुंडी देशाची राजधानी आहे आणि देशाचे चलन बुरुंडीयन फ्रॅंक हे आहे.


  1. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये १४ वी 'साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (SAARC) विधी परिषद २०१७' आयोजित करण्यात आली आहे.
  2. कोलंबोमध्ये  २७ - २९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान संपन्न झालेल्या SAARC देशांच्या सरन्यायाधीशांच्या ११ व्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद भरविण्यात आली.
  3. या कार्यक्रमामधून न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, कायदेतज्ञ आणि इतर शिक्षणतज्ज्ञ यांना कायदेविषयक बाबींवर आणि त्यांच्या संबंधित देशांतील नवीनतम कायदेविषयक माहितींचे आदानप्रदान करण्यासाठी एक मंच प्रदान करण्यात आला आहे.
  4. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (SAARC) ही एक प्रादेशिक आंतरसरकारी संस्था आहे आणि दक्षिण आशियातील देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य राज्ये असून याची ८ डिसेंबर १९८५ रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली.


  1. स्वतंत्र कॅटालोनियावर स्पेन सरकारने आज थेट ताबा मिळवला असून, स्थानिक सरकार बडतर्फे केले आहे. कॅटालोनियाच्या प्रांतिक संसदेने स्पेनपासून स्वतंत्र होण्याची घोषणा केल्यानंतर स्पेन सरकारने तातडीने ही पावले उचलली असल्याचे सांगण्यात आले.
  2. स्थानिक सरकार बडतर्फे करून स्पेनने कॅटालोनियावर थेट नियंत्रण प्रस्थापित केले आहे. कॅटालोनिया प्रांताच्या पोलिस दलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला स्पेन सरकारने निलंबित केले आहे.
  3. २१ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सार्वमताच्या अधारे कॅटालोनियाच्या प्रांतिक संसदेने      स्पेनपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे संपूर्ण युरोपात खळबळ उडाली आहे.
  4. स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर स्पेन सरकारने तातडीने कॅटालोनियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंत्र्यांची कालच हाकालपट्टी केली होती. तसेच प्रांतिक संसद ही बरखास्त केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेनने पोलिसप्रमुखांना निलंबित करत कॅटालोनियाचा थेट ताबा घेतला आहे.
  5. स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आल्यानंतर कॅटालोनियातील अनेक शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यांवर उतरत आनंद साजरा केला होता; मात्र ही स्वातंत्र्याची घोषण  बेकायदा असल्याचे स्पेनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार कॅटालोनियाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे


Top