
1047 25-Nov-2017, Sat
- देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्याने घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये 101.077 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 64 टक्के जलसाठा आहे.
- या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 157.799 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
- पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 27.07 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 19.63 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 73 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
- गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा असेलेली राज्ये -हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू.
- कमी पाणीसाठा असेलेली राज्ये – राजस्थान, झारखंड, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा.