
1085 26-Jul-2017, Wed
- भारत-चीन सीमाक्षेत्रामधील दशकापासून विवादित प्रदेशात चीनने उंच पर्वतीय रस्ता बांधण्यासाठी आपल्या सैन्यांसह बुलडोजर आणि उत्खनन करणारी उपकरणे पाठवलेली आहेत.
- भूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत असलेल्या डॉकलाम पठार क्षेत्रातून चीनी लष्करी बांधकाम चमूला परत पाठविण्याकरिता गेल्या महिन्यात भारताने आपली सैन्य तुकडी पाठवली होती.
- या तणावग्रस्त परिस्थितीत भारताने शांतीप्रस्ताव मान्य केला होता, मात्र दोन्ही पक्षांनी आपापले सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याच्या सार्वभौम प्रदेशावर रस्ता बांधण्यास भारताने अटकाव करू नये असे चीनने इशारा दिला.
भारतासाठी डॉकलाम क्षेत्र का महत्त्वाचा आहे?
- भूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत डॉकलाम पठार क्षेत्र आहे.
- हे क्षेत्र भूतपूर्व भूटानमध्ये 269 चौरस कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे.
- भारतासाठी हे डॉकलाम पठार हे दुर्गम पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा जमिनी मार्ग असल्याने त्या क्षेत्रावर नियंत्रण राखणे भारताला आवश्यक आहे.
पार्श्वभूमी:-
- 2012 साली भारत आणि चीन यांच्यात एक करार झाला. ज्यामध्ये डॉकलाम क्षेत्रामधील या दोन्ही देशांच्या क्षेत्राची स्थिती ही केवळ सर्व पक्षांच्या संयुक्त चर्चासत्रातूनच निश्चित केले जाईल असे निश्चित केले गेले.
- या क्षेत्राच्या डोकोला शहरापासून ते झोम्पेलरी येथील भुटानी सैन्याच्या छावणीपर्यंत रस्ता बांधण्याचा चीनी सरकारचा मानस आहे.
- भूटानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे स्पष्ट मत मांडले आहे की, अपूर्ण वाटाघाटी असलेल्या प्रलंबित क्षेत्रामध्ये एकतर्फी कारवाई करणे हे कृत्य सन 1988 आणि सन 1998 मध्ये झालेल्या शांतता कराराचे "थेट उल्लंघन" आहे.