1. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांची मुदत राज्यसभा खासदार म्हणून याच महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे. त्यांनी यापूर्वी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
  2. विद्यमान प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गेल्याच आठवडय़ात आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. तसेच फालेरो हे ८ जुलै रोजी आपल्या पदाची सूत्रे  शांताराम नाईक यांच्याकडे सोपवणार आहे.


  1. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया) पश्चिम विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकपदाची सूत्रे केशव शर्मा यांनी येथे स्वीकारली. ते याआधी अलाहाबादच्या सिविल एविएशन ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य होते.
  2. शर्मा यांनी १९८५ साली केंद्रीय लोकसेवा आयोमार्फत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात एरोड्राम ऑफिसर म्हणून कामाला सुरुवात केली.
  3. इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स ऑफ सायन्स आणि एमफिल तसेच आयआयटीमधून मास्टर्स इन मॅनेजमेंट असे शिक्षण घेतलेल्या केशव शर्मा यांचा दिल्ली विमानतळाचे तसेच मुंबई विमानतळाच्या हवाई वाहतूक सेवेचे ( एटीएस ) आधुनिकीकरण या कामात मोठा वाटा आहे. तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोल, एअरपोर्ट मॅनेजमेंट व सेफ्टी मॅनेजमेंट यात ते निष्णात मानले जातात.


  1. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली.संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली.
  2. जी-२० संमेलनात जगातील आघाडीच्या देशांचे नेते म्हणाले, "दहशतवादाच्या प्रसारासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा उपयोग होऊ नये, यासाठी सर्व देश खाजगी विभागासोबत मिळून काम करतील."
  3. तसेच यावेळी सर्व देशांमध्ये दहशतवादासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एकमत झाले. जेव्हा दहशतवाद्यांना जगात कुठेही सुरक्षित आसरा आणि आर्थिक मदत मिळणार नाही, तेव्हाच दहशतवादाचा खात्मा करणे शक्य होईल, असेही या नेत्यांनी सांगितले.


Top