1. भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचे निवासस्थान अर्थात राष्ट्रपती भवन सर्वसामान्य जनतेसाठी आता आठवड्यातून चार दिवस खुले राहणार आहे.
  2. राष्ट्रपती सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चार दिवशी सर्वसामान्य जनतेला राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भवन खुले राहणार आहे.
  3. राजपथवरील गेट क्र. २, हुक्मीमाई मार्गावरील गेट क्र. ३७ आणि चर्च रोडवरील गेट क्र. ३८ या ठिकाणांहून राष्ट्रपती भवनाला भेटीसाठी आलेल्यांना प्रवेश तसेच बाहेर पडता येणार आहे.
  4. आगामी काळात वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमांतून राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी बुकिंगही करता येणार आहे. भवन पाहण्यासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये इतके शुल्क आकारले जाते. ८ वर्षांखालील बालकांना येथे प्रवेश निशूल्क आहे.
  5. भारतीय नागरिकांना राष्ट्रपती भवनातील प्रवेशासाठी आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र तर परदेशी नागरिकांना आपला मुळ पासपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.


  1. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे.
  2. याशिवाय विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड लवकरच करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती करण्याचे संकेतही दिले.
  3. विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.


  1. भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची Brahmos 22 नोव्हेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.
  2. सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
  3. मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला.
  4. मध्यम पल्ल्याच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यातील मैलाचा दगड मानला जात आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांची ठिकाणे अचूकरित्या भेदू शकते. हवेतून दहशतवाद्यांचे असे अड्डे उध्वस्त करण्याबरोबरच जमिनीखालील बंकर्सही उद्धस्त करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.
  5. भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त निर्मिती असणाऱ्या ब्राह्मोसच्या अशा आणखी दोन चाचण्या घेण्याचा भारताचा मानस आहे.


  1. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत दोन दिवस चालणार्‍या पाचव्या ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस (GCCS)२०१७’ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
  2. ही परिषद 'सायबर4ऑल: अॅन इंक्लूजिव, सस्टेनेबल, डेवलपमेंटल, सेफ अँड सिक्युअर सायबरस्पेस' या संकल्पनेखाली भरवली गेली आहे. GCCS प्रथमच आर्थिक सहकार आणि विकास संघटना (OECD) समूहातील देशांच्या बाहेर आणि भारतात आयोजित केली गेली आहे.
  3. सायबर स्पेस विषयावरील जगातली सर्वात मोठ्या परिषदांमधील एक आहे. २०११ साली लंडनमध्ये प्रथम GCCS भरविण्यात आली होती. OECD ची स्थापना १९४८ झाली असून त्याचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे आणि या समूहाचे ३५ सदस्य राष्ट्रे आहेत.


Top