
1439 06-Jan-2019, Sun
- सिंगापूरच्या एशिया कॉम्पिटिटिव्हिटी इंस्टिट्यूट (ACI) या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस निर्देशांक 2018’ प्रमाणे, व्यवसाय सुलभतेत भारताच्या 21 राज्यांमध्ये आंध्रप्रदेश हे राज्य अग्रेसर ठरले आहे.
- या क्रमवारीत आंध्रप्रदेशानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहे.
- ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ म्हणजे देशात व्यवसाय करण्यासाठी तयार केले जाणारे अनुकूल वातावरण.
- हा निर्देशांक तीन घटकांवर आधारित आहे,
- ते आहेत –
- गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची क्षमता,
- व्यवसायांमधील मित्रत्वाचे संबंध
- आणि स्पर्धात्मकतेसंबंधी धोरणे.
- गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत आंध्रप्रदेश तिसऱ्या क्रमांकावर, तर व्यवसायांमधील मित्रत्वाचे संबंध या बाबतीत प्रथम क्रमांकावर आणि स्पर्धात्मकतेसंबंधी धोरणे या बाबतीत चौथ्या स्थानी आहे.