Karad Deputy Superintendent Navnath Dhavale

कऱ्हाडचे उपअधीक्षक करताहेत सोशल इंजिनिअरिंग


605   08-Jan-2018, Mon

कऱ्हाड - चावडीवर होणारी चर्चा चौकात आली, चौकात होणारी चर्चा व्यासपीठावर आली अन्‌ व्यासपीठावर होणारी चर्चा अलीकडच्या काही वर्षांत सोशल मीडियावर आली. सोशल मीडिया म्हणजे समाजातील चर्चा करण्याचे एक नवीन व्यासपीठ बनले आहे. आता ते नवे राहिलेले नाही. मात्र, याच सोशल मीडियाचा वापर करून पोलिस खात्याचे महत्त्वाचे संदेश समाजापर्यंत पोचवण्याची हातोटी जपत त्याचा पुरेपूर वापर करण्याची किमया पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना साध्य झाली आहे. त्यांची वॉट्‌सर्अपवरील चर्चा किंवा एखाद्या घटनेबद्दलच मत व्यक्त करण्याची हातोटी चांगली आहे. 

समाजातील अनेक घटनांची चर्चा ज्या सोशल मीडियावर होत असते, त्या सोशल मीडियाचाच वापर करून दक्षता बाळगण्याची किंवा अफवांना बळी पडू नका, असा संदेश देण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न ढवळे यांच्याकडून होत आहे. समाजाची चर्चा करण्याची माध्यम अथवा सोशल मीडिया बनली आहे. त्यात वॉट्‌सऍपच्या अनेक ग्रुपवर वेगवेगळी चर्चा असते. त्या चर्चेवर ढवळे लक्ष ठेवून असतात. तसेच त्याशिवाय तेथे येणाऱ्या सूचनांना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठीचे प्रयत्न करतात. विशेषकरून शहरातील घटनांवर त्यांचा वॉट्‌सऍपच्या माध्यमातून मोठा "वॉच' आहे. एखाद्या वॉट्‌सऍप ग्रुपवर चर्चा सुरू असेल, तर त्या चर्चेचीही ते दखल घेऊन त्याला अंतिम स्वरूप देताना दिसत आहेत. 

पोलिसांचे संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचे काम ढवळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चोखंदळपणे करत आहेत. त्यांनी कालच टाकलेला सतर्कता बाळगा... बंद घरे फोडून दागिन्यांसह रोकड पळवणारा संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्याकडून घरफोड्यांचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. चोरटा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर थेट सामान्य कऱ्हाडकरांशी एक संवाद साधत असल्याचे सांगताना ढवळे यांनी त्यांच्याकडून म्हणजेच एक अपेक्षा व्यक्त करत पोलिसांनी बंद घरांबाबत केलेल्या सूचनाही ते लोकांपर्यंत पोचवत आहेत. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचा ढवळे  यांचा वेगळ्याच धाटणीचा फंडा लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. 

वास्तविक गडचिरोलीनंतर पहिलीच नियुक्ती मिळालेले ढवळे जिल्ह्यातील तरुण उपअधीक्षक आहेत. सोशल मीडियाचा वापर कसा व किती करावा, याबद्दलचे त्यांचे ज्ञान त्यांनी पोलिस खात्यासाठी वापरून त्यांनी त्याच माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगवर भर दिला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचा त्यांच्याशी थेट संपर्क वाढला आहे