जगाचा आणि भारताचा भूगोल

world geography

168   09-Aug-2018, Thu

आपण मुख्य परीक्षेच्या पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती याची चर्चा करणार आहोत.

या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख वैशिष्टय़, जगभरातील महत्त्वाच्या नैसर्गिकसाधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह), जगाच्या विविध (भारतासह) प्रदेशातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगाच्या स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान, निर्णायक भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलाशये आणि हिमाच्छादने) आणि महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना/घडामोडी उदा. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी सक्रियता, चक्रीवादळे इत्यादी; भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, या बदलाचे परिणाम इत्यादी घटक नमूद करण्यात आले आहेत. थोडक्यात याचे वर्गीकरण प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आíथक) अशा पद्धतीने करावे लागणार आहे व याचा अभ्यास जगाचा आणि भारताचा भूगोल अशा दोन भागांमध्ये विभागून करावा लागणार आहे.

प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादीशी संबंधित माहितीचा अभ्यास करावा लागतो. प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयातील सर्वाधिक कठीण घटक आहे. कारण हा संकल्पनात्मक बाबीशी अधिक जवळीक साधणारा आहे म्हणून या घटकाचे योग्य आकलन होण्यासाठी या घटकाशी संबंधित संकल्पनांचे योग्य आकलन असणे गरजेचे आहे.

*   शिलावरण – यामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भूअंतर्गत व भूबाह्य बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावरणाचा अभ्यास करणाऱ्या विषयाला भूरूपशास्त्र म्हणतात. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जतात. सद्य:स्थितीतील चालू घडामोडीचे महत्त्व पाहता उपयोजित भूरूपशास्त्रासारख्या चालू घडामोडीशी संबंधित घटकांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे.

*   वातावरण – यामध्ये  वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा लागतो.

*   जलावरण – यामध्ये जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली यांचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडीमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती, सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्राबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावश्यक आहे.

*   जीवावरण – या घटकाचा अभ्यास जैवभूगोल या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो.

*   पर्यावरण – या घटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नैसर्गिकस्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची महिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरीस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यास आवशयक आहे.

मानवी भूगोल

मानवी भूगोल याअंतर्गत सामाजिक (लोकसंख्या भूगोल व वसाहत भूगोल) आणि आर्थिकभूगोल इत्यादीशी संबंधित माहिती अभ्यासावी लागते. आता आपण या विषयाची उपरोक्त वर्गीकरणानुसार थोडक्यात उकल करून पाहू.

*   लोकसंख्या भूगोल – मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्या वृद्धी, जन्मदर वितरण, मृत्युदर, िलग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश या घटकांचा २०११च्या जणगणेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवशयक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्यांची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे. या घटकात लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचे सक्तीने अवलंब केल्याने उद्भवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवशयक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इत्यादी.

*   वसाहत भूगोल – वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतीचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी प्रदेशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी एू किंवा रें१३  अशा ज्या योजना राबविल्या जात आहेत त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतीचा अभ्यास करताना वसाहतीचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील भर देणे आवश्यक आहे.

*   आर्थिकभूगोल – या विषयामध्ये मानवी आर्थिकप्रक्रिया व नैसर्गिकसाधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आर्थिकप्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे; त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आर्थिकप्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्रे यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्थावित दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.

उपरोक्त नमूद घटकांच्या आधारे आपणाला एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यास प्रादेशिक भूगोल असे संबोधले जाते. वढरउ च्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल समाविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयाशी संबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्नांमध्ये पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.

प्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)

geography field of study

2021   06-Jun-2018, Wed

मुख्य परीक्षा पेपर एकमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

या विषयाच्या तयारीमध्ये भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भूगोल विषयाचे प्राकृतिक, आर्थिकव सामाजिक असे ठळक तीन उपविभाग करून त्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होईल. विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्या (definition) व प्रक्रियांचा संकल्पनांवर आधारित अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो.

अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तथ्यात्मक बाबी व विश्लेषणात्मक व उपयोजित मुद्दे अभ्यासावेत.

प्राकृतिक भूगोल –

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. नदी प्रणालींच्या अभ्यासातच कृषी घटकातील जलव्यवस्थापनातील (पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, rainwater harvesting महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्यात. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इ. मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.

भौगोलिक घटना/ प्रक्रिया

 • मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.
 • कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत 2 भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/ घडलेली भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिकमहत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

भूरूप निर्मिती

 • भूरूप निर्मिती हा घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाकडून होणाऱ्या अपक्षयामुळे होणारी भूरूपे व संचयामुळे होणारी भूरूपे असे विभाजन करता येईल. भूरूपांमधील साम्यभेदांचीही नोंद घ्यावी लागेल.
 • प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण, भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.
 • भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ.चाच अभ्यास केल्यास ताण थोडा कमी होईल.
 • भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आíथकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा.

भौतिक भूगोल

 • भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदी प्रणाली, पर्वत प्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ.बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
 • जागतिक भूगोलात फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ.चा टेबल फॉरमॉटमध्ये तथ्यात्मक अभ्यास पुरेसा आहे.
 • भारतातील पर्वत प्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिकमहत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.

या सर्व भौगोलिक संकल्पना समजून घेतल्यावर पर्यावरणीय भूगोलाच्या संकल्पनांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरते. त्यानंतर भौगोलिक चालू घडामोडी समजून घेणे सोपे होते.

पर्यावरणीय घटक

 • पर्यावरणीय भूगोलातील पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ, हरितगृह, परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्न जाळे या बाबी समजून घ्याव्यात. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.
 • पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.
 • पर्यावरणविषयक कायदे घटकाची पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच तयारी करावी.

दूरसंवेदन

 • दूरसंवेदनासाठी कार्यरत असलेले उपग्रह, त्यांची काय्रे, या क्षेत्रातील भारताची वाटचाल समजून घेणे आवश्यक आहे.
 • दूरसंवेदनामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान व त्याचे उपयोजन, त्यातून मिळणाऱ्या नकाशांचे वाचन करण्याची पद्धत, मिळणाऱ्या माहितीचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. 

नीरांचल योजना

niranchal project

299   04-Jun-2018, Mon

सिंचनमयता

पूर्वी राबविलेल्या योजनांमधील अनुभव लक्षात घेउन भारत शासनाने ‘नीरांचल’ योजनेची निर्मिती केली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचय योजनेतील पाणलोट क्षेत्र घटकाची लक्ष्यपूर्ती करण्याचे उद्दिष्ट नीरांचलचे असेल.

कोरडवाहू शेतीचा प्रदेश समोर ठेऊन ही योजना आखली आहे. नीरांचल योजना जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्राच्या भूसाधन विभागाकडून राबविली जाणार आहे. महाराष्ट्रसह देशातील नऊ राज्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंअतर्गत सदर योजना राबविण्यात येणार आहे. (इतर आठ म्हणजे गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि तेलंगणा) राज्यांची निवड करताना त्यांचे कोरडवाहू शेतीचे क्षेत्र, दारिद्र्याचा स्तर, प्रकल्पात भाग घेण्याची व खर्च वाटून घेण्याची तयारी हे निकष लावले गेले.

महाराष्ट्रातील अहमदनगर व अमरावती हे दोन जिल्हे निवडण्यात आले आहेत.
 

कोरडवाहूकडे लक्ष वळवण्याची गरज

भारतातील १२७ शेती-हवामान प्रदेशांपैकी ७३ म्हणजे अर्ध्याहून जास्त प्रदेश हा कोरडवाहू प्रकारचा आहे. त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची टंचाई, गरिबीचे जास्त प्रमाण, लोकसंख्येची कमी घनता, बाजारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी.

याच प्रदेशात दुष्काळ पडतात, भूस्तर खालावतो व पर्यावरणीय ताण पडतो. बागायती शेती आता संतृप्ततेकडे पोहोचली आहे. यापुढे अन्नधान्यात वाढ करायची असेल तर कोरडवाहू शेतीकडे लक्ष द्यावे लागेल. 
 

नीरांचल

नीरांचल हा राष्ट्रीय पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प आहे. या योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास मंत्रालय करेल. तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून ठराविक प्रदेशातील कृषी उत्पादने वाढवणे व ‘एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम’ राबविल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये अधिक प्रभावी प्रक्रिया व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाणलोट क्षेत्राची व्याप्ती वाढवणे हे या योजनेचे विकासात्मक उद्दिष्ट आहे.

नीरांचल सध्या चालू असलेल्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाला पूरक म्हणून काम करेल. अपवाद म्हणून नीरांचल काही शहरी पाणलोट प्रकल्पही हाती घेईल.
 

प्रमुख घटक 
केंद्रीय स्तरावर संस्थात्मक उभारणी व क्षमता सवर्धन करण्यासाठी संस्थाची उभारणी, राष्ट्रीय माहिती केंद्र आणि देखरेख व मूल्यमापन यांचा समावेश होतो. या घटकांतर्गत माहितीचे व ज्ञानाचे पद्धतशीरपणे एकत्रीकरण, विश्लेषण व प्रसारण केले जाईल, तसेच सहभागी व्यक्ती व कर्मचाऱ्यांमध्ये सर्वसमावेशक संवाद धोरण विकसित केले जाईल.
राष्ट्रीय नवोन्मेष साहाय्य, नावीन्यपूर्ण विज्ञाननिष्ठ ज्ञानाचे उपयोजन, कृषी, पाणलोट क्षेत्र नियोजन व अंमलबजावणी आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम यामधे सुधारणा घडवून आणणाऱ्या साधनांचा आधार देणे.
सहभागी राज्यांना अंमलबजावणीसाठीचे सहाय्य मिळवणे आणि विज्ञानाधारित तांत्रिक सहकार्याने सुधारणा घडवून आणणे.

प्रकल्प व्यवस्थापन व समन्वय हा घटक नीरंचल प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभावी, कार्यक्षम व प्रतिसादात्मक व्यवस्थापनाची खात्री देईल. 
 

इतर उद्दिष्टे

सर्वसमावेशकता व स्थानिकांच्या सहभागाने पाणलोट क्षेत्राच्या वाढीच्या माध्यमातून समकक्ष जीवनमान व उत्पन्न यामधे वाढ करण्यास पाठिंबा देणे.

जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी करणे, भूमिगत पाण्याचे पुनर्भरण करणे, कोरडवाहू क्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढवून कृषी उत्पादनामध्ये वाढ करणे. कृषी क्षेत्रासाठी अशा प्रकारच्या  योजना राबविल्यास नक्कीच कायम स्वरूपाची उपाययोजना होईल.

दुष्काळप्रवण क्षेत्रात जलसिंचन सुविधा उभ्या राहून त्यातून पर्जन्याधारित शेतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या योजनांच्या अभ्यासासाठी ग्रामीण मंत्रालयाचे संकेतस्थळ अभ्यासावे व त्याला पूरक म्हणून भारत वार्षिकीचा वापर करता येईल. 

परीक्षाभिमुख अभ्यासासाठी संदर्भग्रंथ

geography preparation books

89   14-Aug-2018, Tue

 

जगाचा आणि भारताचा भूगोल :  आपण भूगोल या विषयाचे स्वरूप, त्यातील विविध घटक याविषयी माहिती घेतली. आजच्या लेखामध्ये आपण या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा वापर करावा लागतो तसेच ‘एनसीईआरटी’ची भूगोल विषयाच्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा उपयोग परीक्षेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकेल याची मागे विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे या लेखात चर्चा करणार आहोत.

एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके विषयाच्या मूलभूत आकलनासाठी भूगोल याविषयाचे मूलभूत ज्ञान प्राप्त करण्यासाठी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल, नेमक्या कोणत्या इयतेच्या पुस्तकांचा वापर करावा लागतो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. तसे पाहता इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा वापर करावा लागतो पण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने Contemporary Indi (STD-IX,X), Fundamentals of Physical Geography (I), Indian Physical Environment(XI), Fundamentals of Human Geography (XII), India- People and Economy (XII)

इत्यादी पुस्तकांचा वापर उपयुक्त ठरतो. एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असल्यामुळे हा विषय समजणे तितकेसे कठीण जात नाही.

संदर्भ साहित्य

उपरोक्त नमूद केलेली पुस्तके शालेय विध्यार्थ्यांसाठी लिहिलेली असल्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांबरोबरच बाजारात उपलब्ध असणाऱ्या संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. बाजारात या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन्ही घटकांवर बाजारात स्वतंत्ररीत्या अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. सदर घटकाचा अभ्यास करण्यासाठी पुढे नमूद केलेल्या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल.

Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India – Comprehensive Geography ( by D.R. Khullar) World Geography (by Majid Husain) , World Regional Geography (Tikha, Bali, Sekhaon)इत्यादी.

या संदर्भग्रंथांचा उपयोग भूगोल विषयाची र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

या संदर्भग्रंथाचा वापर या विषयाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन घटकनिहाय पद्धतीने करून केल्यास अधिक फायदा होतो. कारण एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे या विषयाचे मुलभूत ज्ञान प्राप्त होते तर गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचा आधार घेतल्यास अधिक योग्यपणे या संदर्भग्रंथाचा वापर करता येईल.

गेल्या वर्षीचे प्रश्न आणि प्रश्ननिहाय उपयुक्त असे संदर्भसाहित्य

२०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चीनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यासारख्या प्रदेशात मोठय़ाप्रमाणत मर्यादित असतात कारण, हा प्रश्न विचारण्यात आला होता. थोडक्यात या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी उष्णप्रदेशीय चक्रीवादळांची सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा प्रश्न जगातील तीन विविध प्रदेशांच्या प्राकृतिक रचनेशी संबंधित आहे. त्यामुळे नेमके कोणते प्राकृतिक घटक यासाठी जबाबदार आहेत याचीही माहिती असावी. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास सर्व संदर्भग्रंथांचा वापर करता येतो. तसेच मुख्य परीक्षेचा विचार करता भारताचा भूगोल या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात. यात भारताच्या प्राकृतिक, लोकसंख्या, सामाजिक व आíथक घटकाशी संबंधित प्रश्न असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती देणारा ग्रंथ  India – Comprehensive Geography ( by D.R. Khullar)

आहे. म्हणून भारताच्या भूगोलवर सर्वाधिक भर परीक्षेच्या दृष्टीने द्यावा लागतो. या व्यतिरिक्त जगाच्या भूगोलवर देखील प्रश्न विचारले जातात. २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. तसेच हे प्रवाह प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक यावर काय प्रभाव टाकतात, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व हा प्रश्न प्राकृतिक आणि आíथक या दोन्ही पलूंचा आधार घेऊन विचारण्यात आलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या

Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), World Geograhy (by Majid Husain)

इत्यादी संदर्भग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. याच बरोबर या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो ज्यामध्ये मुखत्वे आíथक आणि सामाजिक भूगोल तसेच प्राकृतिक घटकाचा समावेश होतो व यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’ यासारखी वर्तमान पत्रे, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ यासारख्या मासिकांचा वापर उपयुक्त ठरतो. उदारणार्थ २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत पण यामध्ये दिल्लीमधील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे? हा प्रश्न विचारलेला होता. तसेच २०१६ मध्ये दक्षिण चिनीसमुद्र व त्याचे महत्त्व, २०१७ मध्ये कोळसा खाणींची विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते जे पारंपरिक ज्ञान, चालू घडामोडी यांची सांगड घालून विचारण्यात आलेले होते.

 भूगोल आणि इतर विषयांचा सहसंबंध

Geography and correlation of other subjects

2678   08-Feb-2018, Thu

भूगोल या विषयातील ‘पर्यावरण भूगोल’ हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासताना मुखत्वे पर्यावरण परिस्थितिकी,  प्रदेशनिहाय जैवविविधता त्याचे प्रमाण, त्याच्याशी संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े, हरितग्रह परिणाम आणि जागतिक तापमानवाढ यासाठी कारणीभूत असणारे नसíगक व मानवी घटक लक्षात घ्यायला हवेत. वाढते शहरीकरण यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, वनाचा होणारा ऱ्हास तसेच या कारणास्तव निर्माण झालेल्या समस्या आणि एकूणच याचा होणारा एकत्रित परिणाम, याचा जगाच्या व भारताच्या भूगोलसंबंधी विचार करावा लागतोआणि याच्याशी संबंधित माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्वाचे ठरते. याचा अभ्यास कसा करावा याची माहितीपूर्ण चर्चा आपण याआधीच्या लेखात सविस्तरपणे केलेली आहे. सामान्य अध्ययनमधील बहुतांश घटकांचा परस्परपूरक संबंध येतो. त्यावेळी या घटकांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो, ज्यामुळे कमीत कमी वेळामध्ये हे घटक अभ्यासता येऊ शकतात.

सामान्य अध्ययनमधील पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकाअंतर्गत देशाच्या विविध भागात घेतली जाणारी महत्त्वाची पिके व पीक पद्धती, शेती उत्पादन, प्राणीसंगोपन अर्थशास्त्र, सिंचनाचे प्रकार आणि दळणवळण इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे. यासाठी आपणाला आर्थिक भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो. या सर्व घटकांचा सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने अभ्यास करावा लागतो. तसेच याच्या मूलभूत माहितीची तोंडओळख करून घ्यावी लागते. अर्थात यामुळे या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्यासाठी मदत होते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुतांशी भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित असतात.

याच्या मूलभूत माहितीचा अभ्यास सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल विषयातील आर्थिक भूगोलामध्ये झालेला असतो. तसेच या माहितीचा वापर करून पेपर तीनमधील प्रश्न अधिक समर्पकरीत्या सोडवता येऊ शकतात. पण अशा प्रकारे माहितीचा वापर करताना आर्थिक पलूंचा विशेषकरून अधिक विचार करणे, पेपर  तीनमध्ये  अभिप्रेत असते याचे भान ठेवावे लागते. थोडक्यात, जरी मूलभूत महितीची परिभाषा एकसारखी असली तरी उत्तरे लिहिताना पेपरनिहाय लागणाऱ्या दृष्टिकोनाचा अचूकपणे वापर करावा लागतो.

सध्या जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, शहरीकरण, उपलब्ध नसíगक साधनसंपत्तीमध्ये होणारी घट, सतत वाढणारी लोकसंख्या आणि या सगळ्यासाठी कारणीभूत असणारे नसíगक आणि मानवनिर्मित घटक यासंबंधी सतत काही घटना घडत असतात. याची माहिती आपणाला परीक्षेच्या दृष्टीने नोटस स्वरूपात संकलित करावी लागते. या माहितीचा उपयोग सामान्य अध्ययनमधील संबंधित विषयाचा सखोल आणि सर्वकष पद्धतीने तयारी करण्यासाठी   करता येऊ शकतो. या घटकाचा समावेश हा ‘सामान्य अध्ययन पेपर तीन’मधील – ‘जैवविविधता आणि पर्यावरण अंतर्गत नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन’ आदी घटकांच्या अभ्यासक्रमात केलेला आहे. हे घटक पर्यावरण भूगोल या घटकाशी च्याशी संबंधित आहेत.

पेपर तीनमध्ये या घटकाचा अभ्यास करताना मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टीवर कोणते परिणाम झालेले आहेत, तसेच यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केल्या गेलेल्या आहेत याची माहिती असणे अपरिहार्य ठरते. यामध्ये मुखत्वे भारत सरकारने आखलेल्या उपाययोजना, नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, यासाठी पारित करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे याचबरोबर यामध्ये भारताची अधिकृतपणे नेमकी भूमिका काय आहे याची सविस्तर माहिती ठेवावी लागते. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना आणि कायदे याची माहिती असणे गरजेचे आहे. अशा माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजना, कायदे यासारख्या स्रोताचा उपयोग करता येऊ शकतो. या घटकाचा पारंपरिक अभ्यास ‘पर्यावरण भूगोला’मध्ये झाल्यामुळे  याच्याशी घडणाऱ्या चालू घडमोडीची समज अधिक योग्यरीत्या करता येते.

उपरोक्त नमूद केलेल्या घटकासाठी सामान्य अध्ययनमधील पेपरनुसार जो दृष्टिकोन वापरावा लागतो त्यामध्ये भिन्नता येते. त्यामुळे सर्वप्रथम याच्या प्राथमिक माहितीचा अभ्यास करून घ्यावा लागतो, ज्यासाठी आपणाला आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल हे  विषय अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर सामान्य अध्ययनमधील पेपर तीनमधील उपरोक्त नमूद घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा चालू घडामोडीशी अधिक संबंधित असतात.

जरी असे असले तरी विषयाच्या पारंपरिक ज्ञानाची सखोल माहिती असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे लिहिता येत नाहीत. सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल या विषयामुळे पर्यावरण आणि आर्थिक भूगोलाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास झालेला असतो. म्हणूनच संबंधित घटकाचा चालू घडामोडीसोबत समावेश करून र्सवकष पद्धतीने परीक्षाभिमुख तयारी करता येऊ शकते.

Highlight Of 15th Census Of India – 2011

Highlight Of 15th Census Of India – 2011

1702   24-Jun-2018, Sun

Census 2011

Census is nothing but a process of collecting, compiling, analyzing, evaluating, publishing and disseminating statistical data regarding the population. It covers demographic, social and economic data and are provided as of a particular date. Census is useful for formulation of development policies and plans and demarcating constituencies for elections. The Census of India has been conducted 15 times, As of 2011. It has been conducted every 10 years, beginning in 1871.

In Exam point of view, Questions related to Census is very common in all kinds of competitive exams. In every exam, we can expect a minimum of one or two questions from Census. Here is the simple and perfectly categorized 2011 Census of India.

 1. Census 2011 were released in New Delhi on 31st March 2011 by Union Home Secretary GK Pillai and RGI C Chandramouli.
 2. Census 2011 was the 15th census of india & 7th census after Independece
 3. The motto of census 2011 was “Our Census, Our future”.
 4. Total estimated cost of the Census was INR2200 crore (US$350 million).
 5. First census in 1872.
 6. Present Registrar General & Census Commissioner – C.Chandra Mouli
 7. Total Population – 1,210,569,573 (1.21 Billion)
 8. India in 2nd rank in population with 17.64%. decadal growth & China is 1st rank with decadal growth 19% (over 1.35 billion)
 9. World Population is 7 Billions
 10. Increase in population during 2001 – 2011 is 181 Million

Population – 1210.19 million [Males – 623.7 million (51.54%) Females – 586.46 million (48.46%)]

            Top Populous of the Country
1 Uttar Pradesh 19,98,12,341
2 Maharashtra 11,23,74,333
3 Bihar 10,40,99,452
4 West Bengal 9,12,76,115
5 Andhra Pradesh 8,45,80,777
           Least Populous of the Country
1 Lakshadweep 64,473
2 Daman and Diu 2,43,247
3 Dadra and Nagar Haveli 3,43,709
4 Andaman and Nicobar Islands 3,80,581
5 Sikkim 6,10,577

Population Highlight

Highest Populous UT Delhi
Least Populous UT Lakshadweep
Highest Populous state Uttar Pradesh
Least populous state Sikkim
Highest urban Population in india (state& UT) Maharashtra – 4,11,00,980
Lowest urban Population in india (state& UT) Lakshadweep – 26,967
Highest Rular Population in india (state& UT) Uttar Pradesh – 13,16,58,339
Lowest Rular Population in india (state& UT) Lakshadweep – 33,683

Sex Ratio (Females per 1000 Males)

Sex ratio in India 943
Highest sex ratio in state Kerala (1084)
Lowest sex ratio in state Haryana (879)
Highest sex ratio in UT Pondicherry (1037)
Lowest sex ratio in UT Daman and Diu (618)
Child (0-6 years) sex ratio 914
Highest child (0-6) sex ratio in state Mizoram (971)
Lowest child (0-6) sex ratio in state Haryana (830)

Literacy Rate in India

Total Person Literacy Rate 74%
Males 82.14%
Females 65.46%
Highest Literacy Rate in State Kerala (94%)
Lowest Literacy Rate in State Bihar (61.8%)
Hightest Literacy Rate in UT Lakshadweep (91%)
Lowest Literacy Rate in UT Dadra and Nagar Haveli (76.24%)

National Parks in India

The National Parks in India

1465   18-Jun-2018, Mon

National Parks in India

 

Name

State

1. Bandhavgarh National Park

Madhya Pradesh

2. Kanha National Park

Madhya Pradesh

3. Panna National Park

Madhya Pradesh

4. Pench National Park

Madhya Pradesh

5. Thattekkad Bird Sanctuary

Kerala

6. Idukki Wildlife Sanctuary

Kerala

7. Eravikulam National Park

Kerala

8. Kumarakom Bird Sanctuary

Kerala

9. Periyar Wildlife Sanctuary

Kerala

10. Sariska Wildlife Sanctuary

Rajasthan

11. Bharatpur Bird Sanctuary

Rajasthan

12. Keoladeo National Park

Rajasthan

13. Nagarhole National Park

Rajasthan

14. Ranthambore National Park

Rajasthan

15. Sambhar Wildlife Sanctuary

Rajasthan

16. Rajaji National Park

Uttarakhand

17. Corbett National Park

Uttarakhand

18. Manas National Park

Assam

19. Kaziranga National Park

Assam

20. Sanjay Gandhi Wildlife Sanctuary

Maharashtra

21. Mahim Nature Park

Maharashtra

22. Dachigam National Park

J&K

23. Hemis High Altitude Park

J&K

24. Chilka Lake Bird Sanctuary

Odisha

25. Nandankanan Zoo

Odisha

26. Similipal National Park

Odisha

27. Bandipur National Park

Karnataka

28. Dandeli National Park

Karnataka

29. Dudhwa National Park

Uttar Pradesh

30. Gir National Park

Gujarat

31. Mudumalai Wildlife Sanctuary

Tamilnadu

32. Nagarjunasagar Wildlife Sanctuary

Telangana

33. Renuka Wildlife Sanctuary

Himachal Pradesh

34. Sultanpur Bird Sanctuary

Haryana (Gurgoan)

35. Sunderbans Tiger Reserve

West Bengal

Wind & Circulation

Wind & Circulation

347   02-Jun-2018, Sat

Winds are horizontal movements of air in the atmosphere, in contrast to currents, which are vertical movements. Winds usually occur due to uneven distributions of pressure at a global climatic or local scale that wind movements act to balance.

A universal rule of thumb is that whenever an area of high air pressure exists adjacent to an area of low air pressure, the difference in pressure causes wind flows from the high pressure area to the low pressure area. Certain factors contribute to affect wind motion in terms of direction and speed. These are the pressure gradient, the Coriolis effect, friction and centripetal acceleration.

The pressure gradient force is the force generated when pressure differences impacts the intensity of wind flows from areas of high pressure to those of low pressure. The more closely spaced the pressure gradient, the more pronounced the pressure change, resulting in wind types with higher wind speeds. The wind flows in the direction of the change in pressure, which is perpendicular to the isobars (areas with same air pressure).

However, the flow of wind is not exactly perpendicular to the isobar, but deviates somewhat, and this is due to the forces exerted by the Earth’s rotation on its axis from the west to the east. This deviation of wind flows due to the earth’s rotation is called the Coriolis effect. In the Coriolis effect, according to Ferrel’s law, the winds in the Northern hemisphere get deflected to the right and in the Southern hemisphere get deflected to the left. The effect changes the direction of winds but not their speed. However the deflection tends to increase with an increase in wind velocity, mass and latitudinal position on the Earth,

As the air rushing in towards the low pressure area moves towards the centre of rotation, and due to the Coriolis effect, the winds follow a curved path around a local axis that can be of high or low pressure. This phenomenon is due to the force of the centripetal acceleration of winds. The winds might also form different wind types due to another force – friction – that acts to offer resistance to wind motion due to the nature of the earth’s surface.

This frictional force can determine the angle of wind flows, wind velocities, as well as determine the direction of wind flows. Thus for example, while over the ocean, the lack of resistance due to friction can produce high surface wind speeds (P. Tiwari, 2017). The four constitute the four principal factors that contribute to the occurrence of winds and their various types, which shall be discussed below.

General circulation of the atmosphere

 • The pattern of planetary winds depend on:
 • latitudinal variation of atmospheric heating;
 • emergence of pressure belts;
 • the migration of belts following apparent path of the sun;
 • the distribution of continents and oceans;
 • the rotation of earth.
 • The pattern of the movement of the planetary winds is called the general circulation of the atmosphere. The general circulation of the atmosphere also sets in motion the ocean water circulation which influences the earth’s climate.

Winds

 

Hadley Cell

 • The air at the Inter Tropical Convergence Zone (ITCZ) rises because of the convection currents caused by low pressure. Low pressure in turn occurs due to high insolation. The winds from the tropics converge at this low pressure zone.
 • The converged air rises along with the convective cell. It reaches the top of the troposphere up to an altitude of 14 km, and moves towards the poles. This causes accumulation of air at about 30° N and S. Part of the accumulated air sinks to the ground and forms a subtropical high. Another reason for sinking is the cooling of air when it reaches 30° N and S latitudes.
 • Down below near the land surface the air flows towards the equator as the easterlies. The easterlies from either side of the equator converge in the Inter Tropical Convergence Zone (ITCZ). Such circulations from the surface upwards and vice-versa are called cells. Such a cell in the tropics is called Hadley Cell.

Ferrel Cell

 • In the middle latitudes the circulation is that of sinking cold air that comes from the poles and the rising warm air that blows from the subtropical high. At the surface these winds are called westerlies and the cell is known as the Ferrel cell.

Polar Cell

 • At polar latitudes the cold dense air subsides near the poles and blows towards middle latitudes as the polar easterlies. This cell is called the polar cell.
 • These three cells set the pattern for the general circulation of the atmosphere. The transfer of heat energy from lower latitudes to higher latitudes maintains the general circulation.
 • The general circulation of the atmosphere also affects the oceans. The large-scale winds of the atmosphere initiate large and slow moving currents of the ocean. Oceans in turn provide input of energy and water vapour into the air. These interactions take place rather slowly over a large part of the ocean.

Walker Cell

 • Warming and cooling of the Pacific Ocean is most important in terms of general atmospheric circulation.
 • The warm water of the central Pacific Ocean slowly drifts towards South American coast and replaces the cool Peruvian current. Such appearance of warm water off the coast of Peru is known as the El Nino.
 • The El Nino event is closely associated with the pressure changes in the Central Pacific and Australia. This change in pressure condition over Pacific is known as the southern oscillation.
 • The combined phenomenon of southern oscillation and El Nino is known as ENSO.
 • In the years when the ENSO is strong, large-scale variations in weather occur over the world. The arid west coast of South America receives heavy rainfall, drought occurs in Australia and sometimes in India and floods in China. This phenomenon is closely monitored and is used for long range forecasting in major parts of the world. (El-Nino in detail later)

Classification of Winds

 • Permanent winds or Primary winds or Prevailing winds or Planetary Winds
 • The trade winds, westerlies and easterlies.

Secondary or Periodic Winds

 • Seasonal winds: These winds change their direction in different seasons. For example monsoons in India.
 • Periodic winds: Land and sea breeze, mountain and valley breeze.

Local winds

 • These blow only during a particular period of the day or year in a small area.
 • Winds like Loo, Mistral, Foehn, Bora.
 • Primary Winds or Prevailing Winds or Permanent Winds or Planetary Winds
 • These are the planetary winds which blow extensively over continents and oceans.
 • The two most well- understood and significant winds for climate and human activities are trade windsand westerly winds.

Trade Winds

 • The trade winds are those blowing from the sub-tropical high pressure areas towards the equatorial low pressure belt.
 • Therefore, these are confined to a region between 30°N and 30°S throughout the earth’s surface.
 • They flow as the north-eastern trades in the northern hemisphere and the south-eastern trades in the southern hemisphere.
 • This deflection in their ideally expected north-south direction is explained on the basis of Coriolis force and Farrel’s law.
 • Trade winds are descending and stable in areas of their origin (sub-tropical high pressure belt), and as they reach the equator, they become humid and warmer after picking up moisture on their way.
 • The trade winds from two hemispheres meet at the equator, and due to convergence they rise and cause heavy rainfall.
 • The eastern parts of the trade winds associated with the cool ocean currents are drier and more stable than the western parts of the ocean.

Westerlies

 • The westerlies are the winds blowing from the sub-tropical high pressure belts towards the sub polar low pressure belts.
 • They blow from south­west to north-east in the northern hemisphere and north-west to south-east in the southern hemisphere.
 • The westerlies of the southern hemisphere are stronger and persistent due to the vast expanse of water, while those of the northern hemisphere are irregular because of uneven relief of vast land-masses.
 • The westerlies are best developed between 40° and 65°S latitudes. These latitudes are often called Roaring Forties, Furious Fifties, and Shrieking Sixties – dreaded terms for sailors.
 • The poleward boundary of the westerlies is highly fluctuating. There are many seasonal and short-term fluctuations. These winds produce wet spells and variability in weather.

Polar easterlies

 • The Polar easterlies are dry, cold prevailing winds blowing from north-east to south-west direction in Northern Hemisphere and south-east to north-west in Southern Hemisphere.
 • They blow from the polar high-pressure areas of the sub-polar lows.

Secondary Winds or Periodic Winds

 • These winds change their direction with change in season.
 • Monsoons are the best example of large-scale modification of the planetary wind system.
 • Other examples of periodic winds include land and sea breeze, mountain and valley breeze, cyclones and anticyclones, and air masses.

Monsoons

 • Monsoons were traditionally explained as land and sea breezes on a large scale. Thus, they were considered a convectional circulation on a giant scale.
 • The monsoons are characterized by seasonal reversal of wind direction.
 • During summer, the trade winds of southern hemisphere are pulled northwards by an apparent northward movement of the sun and by an intense low pressure core in the north-west of the Indian sub­continent.
 • While crossing the equator, these winds get deflected to their right under the effect of Coriolis force.
 • These winds now approach the Asian landmass as south-west monsoons. Since they travel a long distance over a vast expanse of water, by the time they reach the south-western coast of India, they are over-saturated with moisture and cause heavy rainfall in India and neighboring countries.
 • During winter, these conditions are reversed and a high pressure core is created to the north of the Indian subcontinent. Divergent winds are produced by this anticyclonic movement which travels southwards towards the equator. This movement is enhanced by the apparent southward movement of the sun. These are north-east or winter monsoons which are responsible for some precipitation along the east coast of India.
 • The monsoon winds flow over India, Pakistan, Bangladesh, Myanmar (Burma), Sri Lanka, the Arabian Sea, Bay of Bengal, south­eastern Asia, northern Australia, China and
 • Outside India, in the eastern Asiatic countries, such as China and Japan, the winter monsoon is stronger than the summer monsoon. (we will study about monsoons in detail while studying Indian Climate)

Land Breeze and Sea Breeze

 • The land and sea absorb and transfer heat differently. During the day the land heats up faster and becomes warmer than the sea. Therefore, over the land the air rises giving rise to a low pressure area, whereas the sea is relatively cool and the pressure over sea is relatively high. Thus, pressure gradient from sea to land is created and the wind blows from the sea to the land as the sea breeze. In the night the reversal of condition takes place. The land loses heat faster and is cooler than the sea. The pressure gradient is from the land to the sea and hence land breeze results.

Valley Breeze and Mountain Breeze

 • In mountainous regions, during the day the slopes get heated up and air moves upslope and to fill the resulting gap the air from the valley blows up the valley. This wind is known as the valley breeze. During the night the slopes get cooled and the dense air descends into the valley as the mountain wind. The cool air, of the high plateaus and ice fields draining into the valley is called katabatic wind.
 • Another type of warm wind (katabatic wind) occurs on the leeward side of the mountain ranges. The moisture in these winds, while crossing the mountain ranges condense and precipitate. When it descends down the leeward side of the slope the dry air gets warmed up by adiabatic process. This dry air may melt the snow in a short time.

Tertiary Winds or Local Winds

 • Local differences of temperature and pressure produce local winds.
 • Such winds are local in extent and are confined to the lowest levels of the troposphere. Some examples of local winds are discussed below.

Loo

 • In the plains of northern India and Pakistan, sometimes a very hot and dry wind blows from the west in the months of May and June, usually in the afternoons. It is known as Its temperature invariably ranges between 45°C and 50°C. It may cause sunstroke to people.

Foehn or Fohn

 • Foehn is a hot wind of local importance in the Alps. It is a strong, gusty, dry and warm wind which develops on the leeward side of a mountain range. As the windward side takes away whatever moisture there is in the incoming wind in the form of orographic precipitation, the air that descends on the leeward side is dry and warm (Katabatic Wind).
 • The temperature of the wind varies between 15°C and 20°C. The wind helps animal grazing by melting snow and aids the ripening of grapes.

Chinook

 • Foehn like winds in USA and Canada move down the west slopes of the Rockies and are known as
 • It is beneficial to ranchers east of the Rockies as it keeps the grasslands clear of snow during much of the winter.

Mistral

 • Mistral is one of the local names given to such winds that blow from the Alps over France towards the Mediterranean Sea.
 • It is channeled through the Rhine valley. It is very cold and dry with a high speed.
 • It brings blizzards into southern France.

Sirocco

 • Sirocco is a Mediterranean wind that comes from the Sahara and reaches hurricane speeds in North Africa and Southern Europe.
 • It arises from a warm, dry, tropical air mass that is pulled northward by low-pressure cells moving eastward across the Mediterranean Sea, with the wind originating in the Arabian or Sahara deserts.The hotter, drier continental air mixes with the cooler, wetter air of the maritime cyclone, and the counter-clockwise circulation of the low propels the mixed air across the southern coasts of Europe.
 • The Sirocco causes dusty dry conditions along the northern coast of Africa, storms in the Mediterranean Sea, and cool wet weather in Europe.

सामाजिक व आर्थिक भूगोल

 Social and economic geography

257   27-May-2018, Sun

आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते.

आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा. उदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी. आर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहू –

(२०१६) ‘खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात.’

(१) बेसीन (२) कावेरी बेसीन (३) कृष्णा-गोदावरी बेसीन.

(२०१४) – ‘सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्हचे महत्त्व काय आहे?’

(२०१४) – ‘इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत?’

(२०१३) – ‘भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत?’

(१) अभियांत्रिकी (२) पेपर व पल्प (३) टेक्स्टाइल्स (४) औष्णिक ऊर्जा

(२०१३) – (१) कापूस (२) भुईमूग (३) भात (४) गहू यांपैकी कोणती पिके खरीप आहेत?

आर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल. उदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेल गॅसवर आधारित २०१६मध्ये विचारलेला प्रश्न पाहता येईल.

सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश, इ. घटकांची माहिती करून घ्यावी. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा, इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात. उदा. ‘स्मार्ट सिटी.’ त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

२०१४ मध्ये ‘चांगपा (Changpa ) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

२०१३ मध्ये – ‘जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावा.’ असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येतील.

भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे. सध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी.

यूपीएससीची तयारी : सामाजिक व आर्थिक भूगोल

social and economical geography

415   01-May-2018, Tue

आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते.

आर्थिक भूगोल:-

आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो.

राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा.

उदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी.

आर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहू –

(२०१६) ‘खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात.’

(१) बेसीन (२) कावेरी बेसीन (३) कृष्णा-गोदावरी बेसीन.

(२०१४) – ‘सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्हचे महत्त्व काय आहे?’

(२०१४) – ‘इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत?’

(२०१३) – ‘भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत?’

(१) अभियांत्रिकी (२) पेपर व पल्प (३) टेक्स्टाइल्स (४) औष्णिक ऊर्जा

(२०१३) – (१) कापूस (२) भुईमूग (३) भात (४) गहू यांपैकी कोणती पिके खरीप आहेत?

आर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल.

उदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेल गॅसवर आधारित २०१६मध्ये विचारलेला प्रश्न पाहता येईल.

सामाजिक भूगोल:-

सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो.

लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश, इ. घटकांची माहिती करून घ्यावी.

यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा, इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात.

उदा. ‘स्मार्ट सिटी.’ त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

२०१४ मध्ये ‘चांगपा (Changpa ) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

२०१३ मध्ये – ‘जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावा.’ असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येतील.

भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे.

सध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे

प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी. 


Top