आर्थिक व सामाजिक विकास

 Economic and social development

214   11-Mar-2018, Sun

आर्थिक विकास हा फक्त वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी निगडीत नसून समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकासात्मक बदल घडून येणे होय. यात समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे अपेक्षित असते. रोजगाराच्या संधी, दारिद्रय़ कमी होणे, आर्थिक विषमता कमी होणे, समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे, यालाच आर्थिक विकास म्हटले जाते. 

सर्वसमावेशकता :

आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत काही मूठभर लोकांनाच फायदा न होता ग्रामीण व प्राथमिक क्षेत्रातील बहुसंख्य लोकांना फायदा व्हावा म्हणून ११ व्या योजनेपासून सर्वसमावेशक (inclusive growth) ही संकल्पना पुढे आली आहे.

आर्थिक विकासाचा निर्देशक : economic indicator of development यात राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, दरडोई उत्पन्न, संपत्तीची समानता, दारिद्रय़ाचा स्तर. 

सामाजिक विकासाचे निर्देशक : social indicators of development शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या वाढीचा दर, लिंगविषयक विकास. 

जागतिक स्तरावरील निर्देशांक :-

संयुक्त राष्ट्र विकास परिषद UNDP च्या मार्फत दरवर्षी डिसेंबर महिन्यात प्रमुख पाच विकासाच्या निर्देशकांचा अहवाल प्रसिद्ध केले जातात. निर्देशकांचे निकष, अहवाल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 

आर्थिक व सामाजिक विकास साध्य करण्यासाठी जागतिक स्तरावर करण्यात येत असलेले प्रयत्न असे सहस्रक विकास लक्ष्य MDGs २०१५ पर्यंत साथ करायची होती. आता शाश्वत विकास लक्ष्य SDGs २०१६-२०३० या कालावधीत एकूण १७ लक्ष्य साध्य करायचे आहेत. यातील प्रमुख लक्ष त्यांच्या भारतातील सामाजिक विकासाशी संबंध यांची माहिती असणे गरजेचे आहे. 


शाश्वत विकास :- 

वर्तमानातील आर्थिक विकास साधनांचा भविष्यातील आर्थिक विकासासाठी नैसर्गिक संसाधने अपुरे पडणार म्हणून ‘शाश्वत विकास’ या संकल्पनेचा जन्म झाला. मग यात शाश्वत विकासासंबंधीच्या व्याख्या परिषदा, घोषणा आणि या आधारे प्रत्येक देशाने आपल्या आर्थिक व सामाजिक विकासाचे नव्याने केलेले नियोजन हे अभ्यासणे महत्त्वाचे आहे. 

दारिद्र :-

किमान मूलभूत गरजा पूर्ण न होणे म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्याचे निकष, दारिद्र्य मोजमाप पद्धती, नेमलेले अभ्यास गट, कृती समिती, त्यांच्या दारिद्र्याच्या व्याख्या, त्यांनी केलेल्या शिफारशी भारतातील दारिद्रय़ाच्या प्रमाणात होणारे बदल, राज्यनिहाय दारिद्र्याची स्थिती, त्याची कारणे, व दारिद्र्य निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम यांचा अभ्यास करावा लागतो. 

लोकसंख्या अभ्यास :-

या घटकावर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेले दिसतात. यामध्ये जागतिक लोकसंख्या त्याच्या, वाढीचे टप्पे, सर्वाधिक व सर्वांत कमी लोकसंख्या असणारे पहिले दहा देश, जगाच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचे अंदाज, अहवाल इत्यादी अभ्यासणे. या घटकातील मुख्य भर भारताच्या लोकसंख्येवर असतो. भारताची लोकसंख्या धोरण, भारताची लोकसंख्येची विविध स्थित्यंतरे, लोकसंख्या वाढीचे टप्पे, लोकसंख्या वाढीचा दर, वितरण, घनता लिंगगुणोत्तर रचना, यामध्ये होणारे बदल त्याची कारणे, साक्षरता, या सर्व घटकांचे राज्यनिहाय विश्लेषण. तसेच नागरिकीकरण, भारताच्या जनगणना २०११ चा अहवाल इत्यादी महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास यामध्ये करावा लागतो. यासाठी census.gov.in या शासकीय संकेतस्थळावरील विश्लेषणात्मक माहिती वाचणे उपयुक्त ठरते. 

या महत्त्वपूर्ण घटकांच्या आधार आर्थिक व सामाजिक विकासाचा अभ्यास करावा लागतो. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचे महत्त्व, भारतातील आर्थिक सुधारणा, पायाभूत संरक्षणाचा विकास इत्यादी घटक अभ्यासणे गरजेचे आहे. 


सामाजिक सेवा :-

सरकारी योजनांचा अभ्यास करणे, नव्या योजना, त्यांची सुरुवात, उद्दिष्टे, लाभकारी गट, योजनांच्या घोषवाक्य mission statement इ. अभ्यासणे महत्त्वाचे. सामाजिक आर्थिक विकासासाठी सरकारने वेळोवेळी अवलंबिलेले धोरणसुद्धा अभ्यासणे गरजेचे आहे.